Huawei Enjoy 70z : 6000mAh बॅटरीसह लाँच झाला दमदार मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Huawei Enjoy 70z : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Huawei ने एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Huawei Enjoy 70z असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 6000mAh दमदार बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन निळा, पांढरा आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्यांच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

6.75-इंचाचा डिस्प्ले-

Huawei Enjoy 70z ची लांबी 168.3 मिमी, रुंदी 77.7 मिमी आणि जाडी 8.98 मिमी आहे. या स्मार्टफोनचे वजन 199 ग्रॅम आहे. यामध्ये HD+ 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.75-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 90.26% स्क्रीन-टू-बॉडी रेशो मिळतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Kirin 710A ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला असून हा मोबाईल Huawei च्या HarmonyOS 4.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

कॅमेरा – Huawei Enjoy 70z

मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Enjoy 70z च्या पाठीमागील बाजूला 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने मोबाईल मध्ये 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 22.5W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Huawei Enjoy 70z हा मोबाईल सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Huawei Enjoy 70z च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1099 युआन (सुमारे 12,672 रुपये) आहे. तर 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1299 युआन (सुमारे 15,275 रुपये) आहे. हा स्मार्टफोन अधिकृतपणे 24 फेब्रुवारी 2024 पासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.