हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| व्हॅलेंटाईन डे निमित्त सॅमसंग गॅलेक्सीने आपल्या नुकत्याच लॉन्च झालेल्या Samsung Galaxy S23FE स्मार्टफोनवरील किमती कमी केल्या आहेत. हा स्मार्टफोन लॉन्च झाला त्यावेळी याची किंमत 64,999 रुपये इतकी होती. परंतु आता नव्या डिस्काउंटमुळे याची किंमत 54,999 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे 50 MP चे प्रायमरी कॅमेरा आणि फास्ट चार्जर असलेला हा फोन तुम्हाला दहा हजार रुपयांनी स्वस्त बसत आहे.
Samsung Galaxy S23FE किंमत किती?
Samsung Galaxy S23FE हा 8GB + 128 GB आणि 8GB + 256 GB अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही व्हेरियंटवर पाच हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच सर्व प्रकारच्या कलर ऑप्शनमध्ये हा डिस्काउंट उपलब्ध आहे. 128 GB व्हेरियंट तुम्हाला 54,999 रुपयांना बसेल. त्याचबरोबर, 256 GB व्हेरियंट 64,990 इतक्या किमतीला घेता येईल. हा फोन तुम्ही HDFC Credit Card आणि Debit Card वरून घेतला तर त्यावर 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल.
Samsung Galaxy S23FE फीचर्स
हा स्मार्टफोन तुम्हाला दोन व्हेरियंटमध्ये मिळून जाईल. यात 8GB + 128 GB आणि 8GB + 256 GB असे दोन प्रकार असतील. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.4 इंचाच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळेल. तसेच, 120 Hz रिफ्रेश रेट्सचा डिस्प्ले असेल. तर व्हिजन बूस्टर टेक्नोलॉजी देखील मिळेल. ऑफरमध्ये सुरू असलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर निवडता येतील. तर प्रायमरी कॅमेरा 50 MP असेल. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम मिळून जाईल. 4500 mAh बॅटरीची क्षमता असेल.




