Satara News : पुसेसावळी दंगली प्रकरणाचा तपास CBI आणि NIA कडे द्या; मानवाधिकार परिषदेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात 10 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दंगलीची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या घटनेचा पोलिसांनी तपास करीत आरोपीनाही अटक केली. आता या घटनेनंतर भारतीय मानवाधिकार परिषदेचे सदस्य तथा माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुसेसावळी घटनेतील चौकशी दरम्यान पोलिसांना मिळालेला पाकिस्तानातील नंबरचा तपास हा सीबीआय आणि एनआयए मार्फत केला जावा, अशी मागणी केली आहे.

माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेत सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घडलेल्या घटनेचा अहवाल सादर केला आहे. यावेळी मोकाशी म्हणाले की, ऑगस्ट-सप्टेंबर 2023 दरम्यान सातारा शहर आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दंगल घडली होती. सोशल मीडियावर त्यावेळी काही पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. यात एका समुदायाच्या सदस्याचा दंगलीत मृत्यू झाला होता आणि पुसेसावळी गावातील हल्ल्यात सुमारे 10-15 लोक जखमी झाले.

या घटनेतील गुन्ह्यांमध्ये 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान सातारा शहर आणि पुसेसावळी येथे 6 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात सोशल मीडिया मेसेजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाईल कोड 092 हा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानात नोंदणी केलेल्या मोबाईलवरून सातारा शहरातील लोकांना धमकीचे संदेश येत असल्याची बाब गंभीर आहे. यात समाजकंटकांचा सहभाग तर आहेच. पण, सीमापार संपर्काचे गांभीर्यही लक्षात घ्यावे लागेल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/345952694550348

अशा प्रकारच्या घटना घडल्या नंतर त्याचा स्थानिक लोकांवर होणारा परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय मानवाधिकार परिषदेने या समस्येत हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. घडणाऱ्या घटनांची साखळी, घटनांचे मूळ आणि त्यामागील कारणे शोधण्यासाठी एक सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेत या मुद्द्यावर सर्वसमावेशक सत्यशोधन अहवाल सादर केला आहे. या घटनांचे निरनिराळे स्वरूप, पुसेसावळी व सातारा शहरात त्या काळात काय घडले याचे खरे चित्र मांडण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार परिषदेच्या सत्यशोधन समितीने आपला अहवाल सादर केला आहे.

तसेच यासंदर्भात संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सातारा शहर पोलीस ठाण्याचे फडतरे यांना निवेदन द्वारे करण्यात आली होती. सातारा शहरातील गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच तीन दिवसांनी 18/8/2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. आणिही गोष्ट प्रथम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात पसरली.

कौन्सिलच्या चौकशीत नेमक काय लागलं हाती?

ज्यावेळी कौन्सिलने चौकशी केली त्यावेळी हाती महत्वाची गोष्ट लागली. यि म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता जो एक सशुल्क गट आहे. ज्यामध्ये सुमारे 108 सदस्य आहेत. ज्यात 6-7 पाकिस्तानी नंबर आहेत (+92). या ग्रुपद्वारे नवीन संदेश तयार आणि प्रसारित केले जातात. गटातील पाकिस्तानी सहकाऱ्याचे संकेत धोकादायक आहेत. ज्याची सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या संमतीने चौकशी होणे अपेक्षित आहे. याचा स्थानिक लोकांकडे तंत्रज्ञानाचा आधार असेल का?, याबद्दल शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी हा संवेदनशील विषय व्यावसायिक पद्धतीने हाताळला नाही. +92 सह मोबाईल क्रमांकाने दर्शवल्यानुसार स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या उपस्थितीची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे अहवालाद्वारे आम्ही मांडले असल्याची माहिती मोकाशी यांनी यावेळी दिली.