Saturday, January 28, 2023

भारतात उपासमार वाढली!! जागतिक भूक निर्देशांकात 107 व्या स्थानी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) सूचीत 121 देशांमध्ये भारत 107 व्या स्थानी आहे. कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या या वेबसाइटने याबाबत रिपोर्ट दिला आहे. या यादीत आपले शेजारील राष्ट्रे नेपाळ आणि पाकिस्तानने आपल्याला मागं टाकलं आहे. गेल्या वर्षी भारत या सूचित १०१ क्रमांकावर होता.

121 देशांच्या या यादीमध्ये भारत 107 व्या स्थानावर आहे, तर आपला कट्टर विरोधक असलेला पाकिस्तान 99 व्या स्थानावर आहे. नेपाळ 81व्या स्थानी असून बांगलादेशचा नंबर 84 वा आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटे आणि आव्हानांना तोंड देणारा श्रीलंका देश मात्र या यादीमध्ये 64 व्या स्थानी आहे. हे सर्व पाहता भारतात उपासमारी बाबत चिंताजनक परिस्थिती आहे.

- Advertisement -

दरम्यान, या अहवालानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक तळाला आहे. भारतातील 22.4 कोटी लोक कुपोषित मानले जातात. माननीय पंतप्रधान कुपोषण, भूक, मुलांमधील वाढ आणि नासाडी यासारख्या वास्तविक समस्यांकडे कधी लक्ष देतील? असा सवाल त्यांनी केला आहे.