धक्कादायक ! भंडाऱ्यात पती-पत्नीची झोपेत निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही या ठिकाणी घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली.

काय घडले नेमके ?
सुशील बोरकर आणि सरिता बोरकर अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत. गुरुवारी रात्री बोरकर कुटुंब झोपी गेलं होतं. पती-पत्नी एका खोलीत झोपले होते. तर शेजारच्या दुसऱ्या खोलीत त्यांची दोन मुलं झोपली होती. याचदरम्यान हि धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सकाळी या दोघांनी बराच वेळ घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत (Murder) पडलेले आढळून आले. यानंतर शेजारच्यांनी गोबरवाही पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरु केला आहे.

वर्ध्यात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला
वर्ध्यातदेखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री वर्ध्यातील प्रसिद्ध महावीर उद्यानात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानेच महिला सुरक्षा रक्षकावर अ‍ॅसिड हल्ला (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!