कराटे चॅंपियन बायकोने नवऱ्याचा मोडला पाय; नवरा म्हणतोय, मला बायकोपासून वाचवा….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोशल मीडियावर एका व्यक्तीने कराटे चॅम्पियन मुलीशी प्रेमळ गप्पा मारल्या, त्यानंतर तिला आपला जीवनसाथी बनविले. पण त्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भूकंप झाला. जेव्हा जेव्हा बायकोबरोबर क्षुल्लक भांडण व्हायचे तेव्हा बायको तिच्या नवऱ्यावर कराटे कौशल्याचा प्रयत्न करीत असे. शनिवारी या दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की नवऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला. नवरा व्हीलचेयरवरुन बहाल्फ रुग्णालयात पोहोचला आणि तेथील पोलिसांना बोलावले त्यांना विनंती केली की, मला माझ्या बायकोपासून वाचवा…. ही विचित्र घटना दिल्ली-एनसीआरमधील नोएडाची आहे.

महिलांचा घरगुती हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी सरकारने कायदा बनविला, त्यामध्ये पुरुषांपासून महिलांचे संरक्षण करण्याची तरतूद करण्यात आली होती, परंतु नोएडाच्या सेक्टर -१९ मध्ये कराटे चॅम्पियन पत्नीने आपल्या नवऱ्याला जबरदस्त मारहाण केली. जखमी पती आता पोलिसांकडे आपली कैफियत मांडत आहे. दीपक साहनी असे त्या जखमी नवऱ्याचे नाव आहे.

दीपक साहनीला रविवारी सकाळी त्याचे वडील अशोक साहनी व्हीलचेअरवरून जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. दीपकच्या एक पायावर फ्रॅक्चर आहे. त्याचे वडील अशोक साहनी म्हणाले की, दोघांनी मे 2019 मध्ये लग्न केले होते. या दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असतात. दीपकच्या बायकोने नेहमीच त्याला मारहाण केली. बायको ज्युडो-कराटे चॅम्पियन आहे आणि तिने आपल्या कौशल्याचा वापर नवऱ्यावर केला आहे. यापूर्वीही तिने दीपकलाही दुखापत केली आहे. त्याच्या डोक्यात फ्रॅक्चर होता. अद्याप त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे.

सोशलमिडीयावरील भेट पडली महागात

दीपक आणि त्याच्या बायकोची दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावर भेट झाली. भेटीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि दोघे लग्नाच्या बंधनात अडकले पण, कराटे चॅम्पियन पत्नीने त्याला आपल्या कौशल्याचा बळी बनवले. पत्नीच्या कराटे चॅंपियन कौशल्याने त्यांच्या नात्याला ग्रहण लागले. पत्नीने पतीला बेदम मारहाण केली.

पीडित दीपकने सांगितले की, लग्नानंतर घरात फक्त किरकोळ भांडण होत होती, जसे की सामान्यत: घरात होत असतात, परंतु काही दिवसानंतर ही भांडने वाढू लागली. ती माझ्यावर वर्चस्व गाजवू लागली. यानंतर तिने बर्‍याचदा मला मारहाण करण्यास सुरवात केली. शनिवारी रात्री तिने मला धक्का दिला म्हणून माझा पाय मोडला. मी त्याच प्रकारे रात्रीत वेदनेने व्हीव्हळत पडून राहिलो. रविवारी सकाळी मी कसा तरी बाहेर जाऊ लागला, त्यानंतर तिने हल्ला करुन मला जखमी केले.

याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment