ऐकावं ते नवलचं… बायकोला आवडतो म्हणून नवरोबाने चक्क गाढवचं दिलं भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. परंतु गाढव हा मुर्ख प्राणी आपण समजत असलो तरी तो प्राणी हा सगळ्यात जास्त मेहनती आहे. एका लग्नात मात्र एक अजब प्रकार घडला आहे. एका लग्नात नववधूला गिफ्ट म्हणून तिच्या नवरोबाने चक्क गाढवचं भेट म्हणून दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका प्राणीपेमीनं हा व्हिडीओ आपल्या इन्टाग्राम पोस्टवर शेअर केला आहे. या व्हिडीओत आपल्या बायकोला नवऱ्यानं गाढव भेट म्हणून दिली आहे. गाढवाची पिल्लं त्या वधूला खूप आवडतात म्हणून तिच्या नवरोबाने तिला गाढवच भेट दिले. हा प्रकार पाहून नववधूला सुरूवातीला चांगलाच धक्का बसला. परंतु नंतर तिच्या नवऱ्यानं तिला अशी भेट लग्नात देण्याचं खरं कारण विचारलं तेव्हा चक्क तिनं त्या गाढवाला मिठीच मारली.

https://www.instagram.com/p/Cl6tOLxj33Y/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

आपण प्राणी प्रेमी असल्यानं आपल्यासोबत फारशी कोणी मुली लग्नासाठी तयार होत नाहीत, असं हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या आणि लग्नातील नवरदेवानं व्हिडीओत सांगितले आहे. परंतु आपल्या या होणाऱ्या बायकोला गाढव फार आवडते हे ऐकून तिची आणि माझी ओळख वाढली. आमच्या दोघांचे त्यामुळे ट्यूनिंग झाले. योगायोगानं तिच्या आईलाही गाढव हा प्राणी आवडतो. म्हणून सरप्राईझ म्हणून मीही लग्नाला प्रेझेंट म्हणून गाढवांचे पिल्लू गिफ्ट केले, असे नवरोबाने म्हंटले आहे.