औरंगाबाद | गंगापूर तालुक्यातील टाकळी येथील रावसाहेब थोरात (25) याचा खून त्याच्याच गावातील तरुणाने साला आणि भाच्याच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपीच्या पत्नीला मृत विकास सतत फोनवर अशील बोलून त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
संजय बाबुराव थोरात वय 37, (रा. कदीम टाकळी) अनिकेत सुधाकर आव्हाड वय 21, रा. लोणी, ता. वैजापूर टाकळी) आणि बाळू माणिक नितनवरे (रा. क्रांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितनुसार विहिरीत 14 जुलै रोजी विकासचा मृतदेह आढळला होता. विकासाच्या शरीरावर जखमा असल्याने त्याचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह विहिरीत टाकल्याचे समजले. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात रावसाहेब थोरात यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुदें, उपनिरीक्षक संदीप सोळंके, हवालदार विठ्ठल राख, दीपेश नागझरे, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव ,गणेश गांगवे ,संजय तांदळे, रामेश्वर धापसे , ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने या खुनाचे रहस्य उलगडा केला.