हैद्राबादमधील अभियंत्यांचा इको फ्रेंडली उपक्रम; गाडी सफाईसाठी तयार केलं वाफेवर चालणारं यंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाडी धुण्यासाठी किमान १० ते १५ लीटर पाणी लागतं हे आपल्याला माहिती आहे. पण गाडी धुण्यासाठी इको फ्रेंडली पद्धती अवलंबल्याचं तुम्ही कधी ऐकलंय किंवा पाहिलंय का? हैद्राबादमध्ये राहणाऱ्या दोन अभियंत्यांनी वाफेवर चालणारं गाडी धुलाई यंत्र शोधून काढलं आहे.

व्ही.मनिकांत रेड्डी आणि त्याच्या मित्राने पाण्याची बचत करणारं हे यंत्र शोधून काढलं असून तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून केवळ वाफेच्या साहाय्याने गाडीची धुलाई करणं आता शक्य होणार आहे. या यंत्राच्या वापरामुळे नेहमीपेक्षा दहापट कमी पाणी लागणार असून हा अभिनव प्रयोग लोकांना नक्की आवडेल असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment