Hyperloop Track : भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती घडणार आहे. सध्या आधुनिक महामार्ग , बुलेट ट्रेन , मेट्रो अशा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन चालू आहे. अशातच आता IIT मद्रासने विकसित केलेला देशातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक आता पूर्णतः तयार झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने याचा व्हिडिओ सोमवारी शेअर करत ही ऐतिहासिक प्रगती जाहीर केली.
हायपरलूप म्हणजे काय? (Hyperloop Track)
हायपरलूप ही भविष्याची वाहतूक तंत्रज्ञान प्रणाली आहे, ज्यामध्ये ट्रेन एका विशेष व्हॅक्यूम ट्यूबमध्ये 1100 किमी प्रतितास वेगाने धावते. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. हा ट्रॅक 410 मीटर लांब असून, IIT मद्रास परिसरातच उभारण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली आहे. जर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले, तर भारतातील सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बदलू शकते.
बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान (Hyperloop Track)
सध्या भारतात प्रस्तावित बुलेट ट्रेन जास्तीत जास्त 450 किमी/तास वेगाने धावू शकते, तर हायपरलूपचा वेग 1100 किमी/तास असेल. यामुळे दिल्ली ते जयपूर किंवा मुंबई ते पुणे यांसारखी शहरे अवघ्या 30 मिनिटांत गाठणे शक्य होईल. जलद प्रवासामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हायला मदत होणार आहे.
लवकरच हायपरलूपचा ट्रायल रन
हायपरलूप केवळ वेगवानच नाही, तर ऊर्जासंवर्धनशील आणि पर्यावरणपूरक असेल. जर ट्रायल यशस्वी ठरला, तर भारत हायपरलूप तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या मोजक्या देशांमध्ये सामील होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे हे तंत्रज्ञान भविष्यातील प्रवासाला वेग, सुरक्षितता आणि आरामदायीपणाची जोड देणार आहे. लवकरच हायपरलूपचा ट्रायल रन सुरू होणार असून, भारताच्या वाहतूक (Hyperloop Track) क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे