Hyperloop Train : टाटा ते रांची प्रवास अवघ्या काही तासांवर आणणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने IIT मद्रासने केलेल्या यशस्वी हायपरलूप चाचणीनंतर, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शक्यता आणखी बळकट झाल्या आहेत. विशेष म्हणजे, टाटा स्टीलही या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
IIT मद्रासची मोठी कामगिरी (Hyperloop Train)
IIT मद्रासने 422 मीटर लांब हायपरलूप ट्रॅकवर पहिली यशस्वी चाचणी केली आहे. या चाचणीत 700 किमी प्रतितास वेगाने पॉड्स धावण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात आला. रेल्वे मंत्रालयाच्या आर्थिक मदतीने विकसित केलेला हा प्रोटोटाइप, भारतात हायपरलूप तंत्रज्ञानाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले आहे.
टाटा स्टीलची महत्त्वपूर्ण भागीदारी (Hyperloop Train)
या हायपरलूप प्रकल्पात टाटा स्टील देखील आघाडीवर आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी टाटा स्टील आणि ट्यूटर हायपरलूप यांच्यात IIT मद्राससोबत सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार, हायपरलूप टेक्नोलॉजीचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येणार आहे. हायपरलूप ट्रॅकसाठी आवश्यक स्टील आणि कॉम्पोझिट मटेरियल डिझाइन आणि उत्पादनात टाटा स्टील आपली विशेष कौशल्ये वापरत आहे.
रघुवर दास यांची कल्पना प्रत्यक्षात येणार?
टाटा ते रांची हायपरलूप प्रकल्पाची मुहूर्तमेढ 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांनी रोवली होती. रांची ते टाटा अवघ्या काही मिनिटांवर आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. 2019 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. यासाठी बेलारूसच्या एका (Hyperloop Train) कंपनीसोबत चर्चाही झाली होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्प काहीसा थांबला. आता रेल्वे मंत्रालय आणि टाटा स्टीलच्या सक्रिय सहभागामुळे हे स्वप्न पुन्हा साकार होण्याची आशा निर्माण झाली आहे.
हायपरलूप म्हणजे काय? (Hyperloop Train)
हायपरलूप ही एक अत्याधुनिक वाहतूक प्रणाली आहे. एका लांबट, कमी दाबाच्या टनेलमध्ये एरोडायनॅमिक पॉड्स किंवा कॅप्सूल जवळपास 700-800 किमी प्रतितास वेगाने धावतात. ही तंत्रज्ञान क्रांती देशातील वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देईल आणि प्रवासाचा वेळही प्रचंड वाचवेल.
टाटा ते रांची प्रवास आता काही तासांवरून काही मिनिटांवर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे झारखंडच्या विकासाला नवे पंख मिळतील. हायपरलूपच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.