मी बीडीओ, मुलगा वकील म्हणत राज्य मार्ग खटाव तालुक्यात ट्रॅक्टरने नांगरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
मी रिटायर बीडीओ, मुलगा वकील त्यामुळे मी सगळा डांबरी रस्ता उकरू शकतो, असे म्हणत चक्क काही महिन्यापूर्वीच तयार केलेला राज्य मार्ग 143 ट्रॅक्टरने नांगरला आहे.  वंजारवाडी (लक्ष्मीनगर) येथील शामगांव खिंड, पारगाव, गोरेगांव, पुसेसावळी, वंजारवाडी (लक्ष्मीनगर), गणेशवाडी, औंध असा असलेला राज्य मार्ग पुसेसावळी येथील रस्त्यालगत नांगरण्यात आला आहे. तेव्हा रस्त्यांचे नुकसाना करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

गावातीलच शेतकरी श्रीरंग दादू खोत आणि ट्रॅक्टर मालक रमेश लक्ष्मण खोत यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली आहे. यावेळी शेताशेजारील रस्ता नाल्यासह साईड पट्टीही डांबरीकरण पर्यंत नांगरून टाकली आहेत. तसेच रस्त्यावर असलेली नंबरी दगडेही ट्रॅक्टरच्या सहाय्याने हलवली आहेत. याबाबत विचारणा करणाऱ्या ग्रामस्थांना संपूर्ण रस्ता नांगरला तरीही माझं कोणीच काही करू शकत नाही. मी स्वतः सेवानिवृत्त गटविकास अधिकारी असल्याने मला कायदा माहिती आहे, असे सांगत आहे.

सेवानिवृत्त बीडीओ यांच्याकडून असे बोलले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले, असून संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी. त्याकरिता येत्या बुधवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दोषीवर कारवाई न झाल्यास तहसील कार्यालय खटाव समोर लक्ष्मीनगर ग्रामस्थ आत्मदहन करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.