औरंगाबाद : लोकसेवा आयोगामार्फत २०१९ ला परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळाली नाही. या पात्र उमेदवारांनी शनिवारी विभागीय आयुक्तलयासमोर दुपारी एक वाजता मी अधिकारी तरी बेरोजगार हे अनोखे आंदोलन करीत पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची मागणी केली.
गेल्या दोन वर्षापासून पात्र असलेल्या या उमेदवारांनी हे आंदोलन केले. मी पोलिस उपअधीक्षक तरी बेरोजगार, मी उपजिल्हाधिकारी तरी बेरोजगार,मी तहसीलदार तरी बेरोजगार, मी गटविकास अधिकारी तरी बेरोजगार, माझे कुटुंब माझी जबाबादारी बिनपगारी आम्ही बेरोजगार अधिकारी अशा आशयाचे बोर्ड झळवत हे आपला रोष व्यक्त केला. पहिला जॉबलेस ऑफिसराची अॅनिव्हरसरी केक कापून साजरी केली. केकवरही बेरोजगार अधिकारी लिहले होते. हा केक कापत हे आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले. आम्ही शासनकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. सरकार दखल घेत नाही. मोठी मेहनत घेऊन आम्ही ही परीक्षा पास झालो आहोत. यासाठी अर्धे आयुष्य खर्च केले.
जवळपास ४१३ उमेदवार नियुक्तीच्या परीक्षेत आहे. पाच मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठी आरक्षणाचा अंतिम निकाल दिला. त्यानुसार आम्हाल तात्काळ विलंब न करता तात्काळ नियुक्ती देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आले. आंदोलनात मनोज चव्हाण, विजय सवादे, रवी सतवन, विवेक पाटील, एकनाथ काळबांडे, माधव पायघन, अनुप पाटील यांनी सहभाग घेतला. या विषयी विभागीय आयुक्तांना निवदेन देण्यात आले आहे.