धक्कादायक ! हातावर सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

0
108
Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या (suicide) केली आहे. मात्र मृत महिलेच्या कुटुंबीयांनी हि आत्महत्या (suicide) नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गळफास लावून घेत पत्नीने आत्महत्या केली, अशी माहिती खुद्द पतीनेच पोलिसांना दिली. पण पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत महिलेचं गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. विशेष म्हणजे या महिलेच्या हातावरच सुसाईड (suicide) नोट लिहिलेल्याचं आढळून आलं आहे. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?
भोपाळच्या सुभाष साहू यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी इंदूचा विवाह झाला होता. इंदू एका सरकारी शाळेत तासिका तत्त्वावर शिक्षिका म्हणून काम करत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदू यांच्या पतीने आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. तिने गळफास घेतला, असं सुभाष यांनी पोलिसांनी कळवलं होतं. पण पोलिसांनी घरी दाखल होण्याआधीच इंदू यांचा मृतदेह (suicide) खाली उतरवण्यात आला होता. पोलिसांनी इंदूचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाला सुरुवात होणार आहे.

हत्या की आत्महत्या?
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता इंदूच्या मृतदेहाशेजारी पती सुभाषचा एक फोटो सापडला. या फोटोच्या मागच्या बाजुला ‘मै बेवफा नहीं हू’ असं लिहिलेलं होतं. तर इंदूच्या हातावर सुसाईट नोट लिहिलेली होती. मृत इंदूच्या हातावर, मी माझ्या मर्जीने जीव देतेय. मम्मी, पप्पी, दादा, सॉरी. माझा मंगळच माझ्या जीव देण्याचं (suicide) कारण ठरला, असं तिने लिहिल्याचं आढळले आहे. पोलीस आता इंदूच्या हातावरील हस्ताक्षरांचीही तपासणी करत आहेत.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here