महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग म्हणजे मुंबई – पुणे एक्सप्रेसवे. नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते तेव्हा या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गाचे लोकार्पण २००२ मध्ये करण्यात आले होते. आता हा महामार्ग खूप महत्वाचा मार्ग बनला असून या मार्गावर मोठी वाहतूक होते. हा महामार्ग सध्या वाहतूक कोंडी मुळे चर्चेत आला आहे. असे असताना मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना या मार्गाबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. हा महामार्ग करताना माझी चूक झाली,असेही ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले, पुणे-मुंबई महामार्ग करताना माझी चूक झाली. मला तो कात्रजपासून करायचा होता. पण काही अधिकारी म्हणाले की खर्च वाढेल. अधिकारी ठराविक वय झालं की रिटायर्ड होतात. नवीन कपडा शिवन्याएवजी त्याला रफ्फू करणे ही त्यांची जिवनदृष्टी असते. त्यामुळे, वाहतूक समस्या निर्माण झाल्याचं सांगताना तो महामार्ग कात्रज ते मुंबई असा करायची कल्पना आपल्या डोक्यात होती, असेही गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. पुण्यात 899 कोटी रुपयांच्या विविध रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते.
तसेच, राज्य सरकारची जबाबदारी असलेले पुणे – मुंबई आणि अहमदनगरच्या पुढे दोन टोल नाके आहेत, तो रस्ता अशा दोन रस्त्यांवरील खड्डे तीन महिन्यांत बुजवले न गेल्यास हे दोन्ही रस्ते राज्य सरकारकडून काढून घेण्याचा इशाराही गडकरींनी दिला आहे.
आठ हजार कोटींना विकला रास्ता
आम्ही पुणे-मुंबई एक्सप्रेस वे बांधला, त्यानंतर कॉग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आलं. त्यानंतर एम एस आर डी सी चे मॅनेजिंग डायरेक्टर करंदीकर माझ्याकडे आले आणि म्हणाले की हा लॉस मेकींग रस्ता आहे. यावर मार्ग कसा काढायचा. मी म्हटलं आता राज्य त्यांच आहे. त्यांना मार्ग काढू दे. मग पवार साहेबांचा फोन आला की एक्सप्रेस वे तुझं अपत्य आहे. समस्या तूच सोडविली पाहिजे. मग मी जुना पुणे मुंबई हायवे एमएसआरडीसी कडे हँडओव्हर केला. पण अट अशी घातली की, या रस्त्यावरचे पूल बांधून रस्ता चांगला ठेवले पाहिजे. पण त्यांनी तो रस्ता आठ हजार कोटींना विकून टाकला आणि ते कामच करत नाहीत, असेही गडकरी यांनी पुणे-मुंबई महामार्गाबाबत म्हटले.