मला बारामती जिंकायची आहे; बावनकुळेंच्या विधानाने दादा गटाची कोंडी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. याच बारामतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. आता आगामी निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे तर भाजपने बारामतीतील संघटन बांधणीसाठी कंबर कसली आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवरच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटात आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात खळबळ उडाली आहे.

बारामतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप गेल्या अनेक काळापासून प्रयत्न करत आहे, मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता आगामी निवडणुकांसाठी भाजप बारामतीत नवा डाव खेळेल असे म्हटले जात आहे. अशातच, मला बारामती जिंकायची आहे, कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या आवाहनंतर बावनकुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीतून उभे राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

मुख्य म्हणजे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बारामती असला तरी आता याच राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे त्यांचा मोठा विरोधक म्हणून अजित पवार गटाकडेच पाहिले जात आहे. एकंदरीत आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी सुप्रिया सुळे या बारामतीतून उभ्या राहिल्या तरी त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात येईल अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादीच्या विरोधात नेमकं कोण उभा राहील हे स्पष्ट झालेलं नाही. सध्या शरद पवार यांच्याबरोबर अजित पवारांना मानणारा वर्ग देखील बारामतीमध्ये मोठा आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच जर चंद्रशेखर बावनकुळे बारामतीतून उभे राहिले तर त्यामुळे अजित पवारांसाठी कोंडी निर्माण होऊ शकते