मी आव्हाडांचा वध करणार; कोणी दिला इशारा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते जिवंत आव्हाड यांनी श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “श्रीराम हे शाकाहारी नाही तर मांसाहारी होते”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्यात अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी, “मी स्वयम जितेंद्र आव्हाड यांचा वध करेल” असा इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज म्हणाले की, “मी स्वयम त्यांना मारून टाकेल, मग मला फाशी झाली तरी चालेल. संत समाज कोणालाही घाबरत नाही. अशा पद्धतीने अकबरच्या भक्तांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही”

मुख्य म्हणजे, “जितेंद्र आव्हाड यांना चपलांचा हार घाला. ते राक्षसी प्रवृत्तीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. जितेंद्र आव्हड जिथे जातील तिथे हिंदू त्यांना चपलाचा हार घालतील” असे हनुमान गढीचे महंत राजुदासजी महाराज यांनी म्हणले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या फक्त त्यानंतर राजकिय वातावरण चांगलेच पेटले आहे. तसेच त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हणले आहे की, “मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही”