IAF : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने मोठा युद्धाभ्यास सुरू केला आहे. या युद्धाभ्यासाला ‘आक्रमण’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत राफेल, सुखोई एसयू-30 आणि मिराज-2000 सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने सामील असून, देशाच्या पूर्व भागातूनही अनेक लढाऊ आणि वाहतूक विमाने यात सहभागी झाली आहेत.
राफेल स्क्वाड्रनचे नेतृत्व, अंबाला आणि हाशिमाराहून सहभाग (IAF)
या युद्धाभ्यासाचे नेतृत्व राफेलच्या दोन स्क्वाड्रनकडून केले जात आहे. हे राफेल विमाने हरियाणाच्या अंबाला आणि पश्चिम बंगालच्या हाशिमारा येथे तैनात आहेत. या व्यतिरिक्त मिराज-2000 लढाऊ विमानेही युद्धाभ्यासासाठी सज्ज करण्यात आली आहेत.
पायलट्सना प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव देणारी मोहिम
या युद्धाभ्यासात भारतीय पायलट्स डोंगराळ आणि मैदानी भागातील लक्ष्यांवर हल्ल्यांचे सराव करत आहेत. लांब (IAF)पल्ल्याच्या मोहिमा, हवा-हवा आणि हवा-भू लक्ष्ये नष्ट करणाऱ्या ‘मिटिओर’ आणि इतर अचूक क्षेपणास्त्रांचा यामध्ये वापर होत आहे. या मोहिमेवर हवाई दलाच्या मुख्यालयाकडून थेट देखरेख करण्यात येत असून, हवाई दलातील सर्वोत्कृष्ट पायलट्स प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यात सहभागी झाले आहेत.
पहलगाममधील हल्ल्यामुळे वाढलेले तणाव
22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन मैदानात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी (IAF) नागरिक ठार झाले, तर अनेक जखमी झाले. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहेत.
भारत सरकारचे कठोर पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पाठिंब्याच्या विरोधात भारताने 1960 मधील सिंधु जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पंजाबमधील एकीकृत अटारी चेक पोस्ट देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
पुलवामानंतरची आठवण
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मिराज-2000 विमानांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर वायुदलात अनेक नवीन ‘फोर्स मल्टिप्लायर’ सामील झाले असून, ‘आक्रमण’ हा युद्धाभ्यास त्याच क्षमतेचे प्रत्यंतर देतो.




