IBPS Bharti 2024 | पदवीधर असाल तर मिळणार थेट IBPS मध्ये नोकरी, असा करा अर्ज

IBPS Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IBPS Bharti 2024  | ज्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे, अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचे आहे. विविध जागांसाठी ही भरती निघालेली आहे. 12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

रिक्तपदे

या भरती अंतर्गत प्रोफेसर असिस्टंट, जनरल मॅनेजर, रिसर्च असोसिएट्स, हिंदी ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर अकाउंटस, एनालिस्ट प्रोग्रामर नेट, एनालिस्ट प्रोग्रॅमर पायथॉन, जनरल मॅनेजर कायदेशीर आणि प्रशासन या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. खाली आम्ही तुम्हाला एक लिंक देणार आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी तुम्हाला 12 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळे आधीच तुम्ही अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता | IBPS Bharti 2024 

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. यासाठी पदवीधर आणि पदव्युत्तर असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 61 वर्ष इतकी आहे.

अर्जशुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये शुल्क असणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.