IBPS PO Recruitment 2025 : बँकेत 5208 जागांसाठी मेगाभरती!! पात्रता काय? अर्ज कसा करायचा?

IBPS PO Recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IBPS PO Recruitment 2025 । बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत तब्बल 5208 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. हि भरती वेगवगेळ्या बँकेसाठी जाहीर झाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी झाली असून उमेदवारांकडून अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 आहे. या मेगाभरती साठी पात्रता काय आहे? पगार किती रुपये मिळेल आणि अर्ज कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या पदासाठी भरती?

सदर भरती हि प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्या बँकेत किती जागा? IBPS PO Recruitment 2025

बँक ऑफ बडोदा – १०००
बँक ऑफ इंडिया – ७००
बँक ऑफ महाराष्ट्र – १०००
कॅनरा बँक – १०००
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ५००
इंडियन बँक – NR
इंडियन ओव्हरसीज बँक – ४५०
पंजाब नॅशनल बँक – २००
पंजाब अँड सिंध बँक – ३५८
युको बँक – NR
युनिअन बँक ऑफ इंडिया – NR

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे मूलभूत संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

IBPS PO साठी अर्ज करण्यासाठी किमान वय 20 वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. म्हणजेच काय तर उमेदवारांचा जन्म 02.07.1995 पूर्वी किंवा 01.07.2005 नंतर झालेला नसावा. IBPS PO Recruitment 2025

अर्ज शुल्क-

SC, ST आणि PwBD श्रेणींसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. तर इतर श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये भरावे लागतील. तुम्ही UPI, नेटबँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सारख्या ऑनलाइन पद्धतीने पैसे भरू शकता.

असा करा अर्ज?

सर्वात आधी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या (IBPS PO Recruitment 2025)
होमपेजवरील “CRP PO/MT-XIII” भरती लिंकवर क्लिक करा.
“New Registration” वर क्लिक करा आणि तुमचे नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी सारखे डिटेल्स भरा.
आता तुम्हाला दिलेल्या ईमेल आयडीवर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा — दिलेल्या तपशीलांनुसार फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र.
डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी काळजीपूर्वक त्याची तपासणी करा.
अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट करा.