IBPS Recruitment 2023 : IBPS अंतर्गत 3049 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. (IBPS Recruitment 2023) इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) ने नुकतीच 3049 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती अंतर्गत तब्बल 3049 जागा भरल्या जाणार आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि स्पेशल ऑफिसर्स (SO) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 21 ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करायचा आहे.

ग्राहकांच्या तक्रारी हाताळणे आणि ग्राहकांशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करणे यासह अनेक जबाबदाऱ्या PO ला सांभाळाव्या लागतात. त्यांना रोख प्रवाह, कर्जे, गहाणखत आणि आर्थिक प्रभारी देखील बनवले जाते. याव्यतिरिक्त, त्यांनी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर देखरेख करणे आवश्यक आहे. IBPS PO पदासाठी पात्रता काय (IBPS Recruitment 2023) आहे? किती रुपये पगार मिळू शकतो आणि अर्ज कसा करायचा तेच आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

शैक्षणिक पात्रता:

सदर उमेदवाराने भारत सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी

वयोमर्यादा –

इच्छुक उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याचा/ तिचा जन्म ०२.०८.१९९३ पूर्वी झालेला नसावा आणि ०१.०८.२००३ नंतर झालेला नसावा. परंतु राखीव श्रेणीतील लोकांना भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

अर्जासाठी फी किती ?

SC/ST/PWD: 175 रुपये
सर्वसाधारण प्रवर्ग – 850 रुपये

पगार किती मिळेल –

IBPS PO ची बेसिक सॅलरी 36,000 रुपये असले तरी भत्ते, एचआरए आणि इतर भत्ते धरून सुरुवातीचा इन हॅन्ड पगार तब्बल 52,000 ते 55,000 मिळतो. हा भलामोठा पगार पाहूनच अनेकजण नोकरीसाठी अर्ज करतात.

असा करा अर्ज – (IBPS Recruitment 2023)

१) सर्वात आधी IBPS च्या अधिकृत पेजला भेट द्या – www.ibps.in
२)होमपेज वरील CRP PO/MT वर क्लीक करा
३)आता अधिसूचना देणाऱ्या लिंकवर क्लिक करा- म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर्स/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-XIII CRP PO/MT-XIII साठी सामान्य भरती ४) प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
५)आता ‘New Registration वर क्लीक करा
६)सर्व माहिती भरा आणि पेजच्या खाली सेव्ह आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा
७)अर्जाच्या या विभागात आवश्यक तपशीलानुसार छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा
८)आता तुमचे वैयक्तिक डिटेल्स, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव भरा. त्यानंतर, तुम्हाला सहभागी बँकांची प्राधान्य यादी भरावी लागेल.
९)तुमचा अर्ज पुन्हा एकदा चेक करा आणि काही चुका आढळल्यास एडिट करा.
१०)ऑनलाइन मोड, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग इत्यादीद्वारे अर्ज फी भरा.
११) आता सबमिट बटणावर क्लिक करा