ICC Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट; ICC ची घोषणा नेमकी काय?

0
27
ICC Champions Trophy 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC Champions Trophy 2025 – आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025 ) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला होणाऱ्या महामुकाबल्याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारीला होणारा भारत-पाकिस्तान सामना सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यात कोणत्या पंचांची निवड केली जाईल याबाबत अनेकांचा उत्सुकतेचा विषय होता. आता आयसीसीने या सामन्याच्या दरम्यान कोण पंच असणार आहे याबद्दल मोठी माहिती सांगितली आहे.

अनुभवी पंचांची निवड (ICC Champions Trophy 2025)

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यात फिल्ड अंपायर म्हणून पॉल रायफल आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांची निवड झाली आहे. मायकल गॉफ हे टीव्ही अंपायर म्हणून कार्यरत असतील, तर एड्रियन होल्डस्टॉक फोर्थ अंपायर म्हणून काम पाहतील. तसेच, डेव्हिड बून मॅच रेफरी म्हणून सामन्याची देखरेख करतील. हे चौघेही अनुभवी पंच आहेत. त्यामुळे यांची निवड करण्यात आली आहे. आता साऱ्याच लक्ष या महत्वाच्या सामन्यांकडे असणार आहे.

संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभाजन –

स्पर्धेतील (ICC Champions Trophy 2025) एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत, तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड बी ग्रुपमध्ये आहेत. रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा हा टीम इंडियाचा संघ आहे . तर पाकिस्तानच्या संघामध्ये मोहम्मद रिजवान (कॅप्टन), सलमान अली आगा, बाबर आजम, फखर जमां, सऊद शकील, कामरान गुलाम, खुशदिल शाह, तैयब ताहिर, उस्मान खान, फहीम अशरफ, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस राऊफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन आणि अबरार अहमद यांचा समावेश आहे .