हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC Champions Trophy 2025 – चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असून , क्रिकेट प्रेमी या सामन्याची आतुरतेनं वाट बघत आहेत. काल रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहॆ , पण भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला टीममधून वगळण्यात आले असून , त्याच्या जागी संघात दुसऱ्या खेळाडूची एंट्री होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का मिळाला आहे. बुमराहला संघातून का वगळण्यात आलं ? त्याच्या जागी दुसरा खेळाडू कोण असणार? याची संपूर्ण माहिती आज आपण या बातमीतून पाहणार आहोत.
गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले –
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला संघातून वगळण्यात आले आहे, कारण त्याच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी हर्षित राणाला (Harshit Rana) संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच, बीसीसीआयने (ICC Champions Trophy 2025) काही दुसऱ्या महत्त्वाच्या बदलांची माहिती दिली आहे. यशस्वी जयसवाल ऐवजी वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)ला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) –
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा (कर्णधार) करणार असून उपकर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. संघामध्ये अनुभवी खेळाडू विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांसारखे प्रमुख फलंदाज असतील. याशिवाय, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या खेळाडूंना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे. त्याचसोबत , वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे असेल. स्पर्धेपूर्वी बुमराहचा वगळला जाणे आणि संघात नवीन चेहऱ्यांचा समावेश भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी थोडा धक्का ठरू शकतो. बीसीसीआयने संघाची तयारी आणि शारीरिक स्थिती यावर लक्ष ठेवून या निर्णयाची घोषणा केली आहे.




