Sunday, March 26, 2023

प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या साथीमुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द तात्पुरती करण्यात आली आणि आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान क्रिकेट जगतातील आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी २०२७ सालची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा ही 14 संघासह खेळवण्याचा विचार आयसीसी करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी 2019 मध्ये एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत 10 संघांचा सहभाग होता. आता ICC नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच T 20 वर्ल्ड कपच्या पुढील मोसमातील 20 संघाच्या फॉर्मुलयाला मान्यता देण्यात आली आहे. तर 2025 आणि 2029 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आठ संघांच्या दरम्यान खेळली जाईल. 1 जून रोजी दुबई इथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना आयसीसी बोर्डाच्या सूत्राने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की,’ आयसीसी बोर्डाने पुढच्या वर्ल्डकप वेळी 14 संघ खेळवण्याचा विचार केला आहे. क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ICC हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात आहे. दहा संघासह वर्ल्डकप खेळणं क्रिकेटला जागतिक स्तरावर पाहिजे तेवढी ग्रोथ मिळत नाही.

- Advertisement -

 सुपर सिक्स फॉरमॅट परत आणणार ?

रिपोर्टनुसार आयसीसीला पुन्हा वन डे वर्ल्ड कप मैच सुपर सिक्स फॉरमॅट परत आणायचा आहे. हा फॉरमॅट 1999 ते 2007 या दरम्यान एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेच्या वेळी होता. पण 2007 च्या विश्‍वचषक आतून भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आल्यानंतर तो फॉर्मेट बदलला गेला. त्यानंतर 2011 ते 2015 च्या विश्वचषकात क्वार्टर फायनल खेळले गेले एक दिवसीय सुपर लीग चा फायदा झाल्याचे ICC ने मान्य केले. त्यामुळे सहयोगी देशापर्यंत क्रिकेटचा विस्तार करण्यास मदत झाली.

दरम्यान टी-20 विश्वचषकात ही संघाच्या विस्तारास हिरवा कंदील दर्शवला जात आहे. ICC म्हणण्यानुसार 2024 ते 2030 दरम्यान दर दोन वर्षांनी t20 वर्ल्ड कप आयोजित केला जाईल. त्याशिवाय चॅम्पियन्स करंडक पुन्हा सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार 8 संघादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाईल आणि यात चार संघाचे दोन गट तयार केले जातील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळले जातील असं आयसीसीने म्हटले आहे.