हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रीजमध्ये आपण अन्न, भाज्या, दुध इ. ठेवत असतो. उन्हाळ्यात तर फ्रीजचा खूप वापर होतो. अन्न व भाज्या खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजचा वापर गरजेचा असतो. परंतु तुम्ही पाहिले असेल कि, कधी कधी फ्रीजमध्ये भरपूर बर्फ जमा होतो. तसेच फ्रीज थंड ठेवण्यामुळे इलेक्ट्रिक बिलाचा आकडाही वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का? फ्रीजमध्ये जमा झालेला बर्फ काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स कोणत्या ते आपण पाहणार आहोत.
1) फ्रीजचा दरवाजा कमी वेळा उघडा –
घरातील काही सदस्य सातत्याने फ्रीजचा दरवाजा उघडत असतेल, ते प्रथम बंद करा. फ्रीजच्या दरवाजाची सातत्याने उघडझाप केल्यास वातावरणातील गरम हवा फ्रीजमध्ये येते आणि फ्रीजमधील थंड हवेशी संयोग पावते. या प्रक्रियेत फ्रीजमध्ये बर्फाचा थर साचतो. असा बर्फाचा थर वारंवार साचल्यास फ्रीज खराब होण्याची शक्यता अधिक असते. क्लिन पिडीया डॉट कॉमवर ही माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे फ्रीजचा दरवाजा जास्त वेळा उघडू नये, असा ऊपाय सांगण्यात आला आहे. फ्रिजच्या तळात टॉवेल अंथरून ठेवल्यास गंज लागणार नाही किंवा फरशी खराब होणार नाही, असाही उपाय या वेबसाईटवर सांगितला आहे.
2) दरवाजाला नवीन रबर बसवा –
फ्रीजचा दरवाजा घट्ट राहण्यासाठी दरवाजाच्या रबरची पाहणी करा. रबर सैल आहे किंवा तो चिरलेला असेल तर वातावरणातील गरम हवा फ्रीजमध्ये येऊ शकते. त्यामुळे फ्रीजमध्ये बर्फ साचतो. आणि फ्रीज बंद पडू शकतो.
3) फ्रीजचे तापमान योग्य ठेवा –
फ्रीजमध्ये बर्फ साचत असेल तर बाहेरच्या वातावरणानुसार फ्रीजचे तापमान बदला. बाहेरचे तापमान थंड असेल तर फ्रिजर कोल्डेस्ट मोडवर सेट करावा. आणि फ्रीझचे तापमान वातावरणानुसार योग्य ठेवा.
4) नियमित साफसफाई करा
फ्रीजमध्ये बर्फ साचत असेल तर फ्रीजची साफसफाई नियमित करा. यामुळे लगेच बर्फ साचणार नाही.
5) फ्रीज डीफ्रॉस्ट करा
प्रत्येक फ्रीजमध्ये डीफ्रॉस्टचे बटन असते. ते सापडले नाही तर फ्रीजमधील पदार्थ काढून बाहेर आईसबॉक्समध्ये ठेवू शकता. फ्रीज पूर्णपणे मोकळा व स्वच्छ करून दरवाजा लावा. फ्रीज स्वच्छ केल्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये पदार्थ ठेवा आणि फ्रीजचे बटन सुरु करा.