Ice Gola Side Effects | दुपारी बर्फाचा गोळा खाण्याचा विचार करत असाल, तर एकदा ‘ही’ माहिती नक्की वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ice Gola Side Effects | उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. उन्हाळा आला की सगळेच लोक हे थंड गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात. गरम व्हायला लागले की, लोक थंड पाणी, कोल्ड्रिंक्स,आईस्क्रीम, आईस गोळा यांसारखे पदार्थ खाऊ लागतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या गोष्टी खूप आवडीने खातात. या थंड गोष्टी खाल्ल्यामुळे तात्पुरता आपल्या घशाला त्याच प्रमाणे आपल्या शरीराला हायसे वाटते. परंतु पुढे जाऊन या गोष्टींचा खूप भयंकर परिणाम आपल्या बॉडीवर होतो. ज्याची आपल्याला आत्ता काहीच कल्पना येत नाही.

उन्हाळ्यामध्ये खास करून थंडगार बर्फाचा गोळा (Ice Gola Side Effects)खायला सगळ्यांनाच आवडतो. अगदी बर्फाचा गोळा विकणारी लोक घरोघरी त्यांच्या गाड्या घेऊन जातात आणि मुलांना हा गोळा खाऊ घालतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच रंगीबेरंगी वेगवेगळ्या फ्लेवरचे गोळे खायला आवडतात. परंतु हा बर्फाचा गोळा खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर देखील खूप घातक परिणाम होतो. आता हा गोळा खाल्ल्याने नक्की काय होते याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

या बर्फाच्या गोळ्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे रंग वापरून हे गोळे तयार केले जातात. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. यामधील रासायनिक आपल्या आरोग्याला इजा पोहोचवते. त्याचप्रमाणे यामध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो. जो मुलांच्या पोटासाठी आणि लिव्हरसाठी खूप घातक असतो. यामुळे आपल्याला पोटाचे तसेच आतड्याचे आजार देखील होऊ शकतात.

त्वचेची एलर्जी

हा गोळा बनवण्यासाठी विविध रंग वापरतात. त्याचप्रमाणे अनेक दिवसांपूर्वीचा बर्फ देखील वापरतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला जर ऍलर्जी असेल, तर ती आणखी वाढू शकते त्यामुळे तुम्ही हा बर्फाचा गोळा खाणे टाळावे.

दातांचे नुकसान | Ice Gola Side Effects

या बर्फाच्या गोळ्यामध्ये जे रासायनिक रंग असतात, ते आपल्या दातांना देखील इजा पोचवतात. बर्फाच्या सिरपमध्ये साखरेचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे दात खराब होण्याचे काम करतात. त्यामुळे अशावेळी हे बर्फाचे गोळे खाणे टाळावे.

घशाचा संसर्ग

बर्फाचा गोळ्या खाल्ल्याने (Ice Gola Side Effects) अनेकवेळा लोकांना घशाचा संसर्ग किंवा घसा दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी खूप वेदना देखील होतात त्यामुळे सहसा बर्फाचा गोळा खाणे टाळावे.

तुम्ही जर अगदी न चुकता दररोज बर्फाचा गोळा खात असाल किंवा आईस्क्रीम खात असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. कारण की हे बर्फाचे गोळे तयार करण्यासाठी लोक दूषित पाणी वापरतात. त्यामुळे घशाचा संसर्ग निमोनिया, कॉलरा, उलट्या, जुलाब यांसारख्या आजार तुम्हाला होऊ शकतात.