ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; FD वरील व्याजदर बदलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ICICI Bank) भारतात खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ICICI बँक ओळखली जाते. त्यामुळे ICICI बँकेच्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे. शिवाय ही बँक आपल्या ग्राहकांसाठी कायम वेगवेगळ्या फायदेशीर योजना घेऊन येत असते. अशातच ICICI बँकेने बल्क एफडीवरील व्याजदर सुधारल्याचे समोर आले आहे. जर तुम्हीही ICICI बँकेचे FD धारक असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण ICICI बँकेने नुकतेच काही कालावधीच्या एफडीवरील व्याजदर बदलले असून हे नवे दर ६ जून २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.

यामध्ये ICICI बँक ही ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बल्क एफडी ऑफर करत आहेत. ज्यावर ICICI बँक ही ४.७५% ते ६.७५% व्याजदर देत आहे. चला तर ICICI बँकेच्या बल्क एफडीवरील नवे व्याजदर पाहूया.

ICICI बँकेच्या बल्क FD वरील नवे व्याजदर (ICICI Bank)

माहितीनुसार, ICICI बँकेच्या ७ दिवस ते १४ दिवस आणि १५ दिवस ते २९ दिवस कालावधीच्या बल्क एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ४.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा ४.७५% इतका व्याजदर दिला जात आहे. तसेच ३० दिवस ते ४५ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ५.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा ५.५०% इतका व्याजदर दिला जातोय. (ICICI Bank) याशिवाय ४६ दिवस ते ६० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ५.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा ५.७५% इतका व्याजदर दिला जातोय. पुढे ६१ दिवस ते ९० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६% आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ६% व्याजदर दिला जातोय.

ICICI बँककेकडून ९१ दिवस ते १२० दिवस, १२१ दिवस ते १५० दिवस आणि १५१ दिवस ते १८४ दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ६.५०% तर ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ६.५०% व्याजदर दिला जातोय. (ICICI Bank) तसेच १८५ दिवस ते २१० दिवस, २११ दिवस ते २७० दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ६.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ६.७५% व्याजदर दिला जात आहे. याशिवाय २७१ दिवस ते २८९ दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ६.८५% आणि ज्येष्ठ नागरिकांसुद्धा ६.८५% दर दिला जातोय.

पुढे १ वर्ष ते ३८९ दिवस कालावधीसाठी ICICI बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.३०% व्याजदर दिला जातोय. तर ३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२५% इतका व्याजदर दिला जातोय. (ICICI Bank) शिवाय १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०५% व्याजदर दिला जात आहे. तर २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे आणि ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना व ज्येष्ठ नागरिकांना ७% व्याजदर प्रदान केला जात आहे.