ICMR Claims Protien Supplements And Powder | विकतच्या प्रोटीन पावडरने वाढतो किडनी आजारांचा धोका, अशाप्रकारे करा घरगुती प्रोटीन पावडर तयार

ICMR Claims Protien Supplements And Powder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ICMR Claims Protien Supplements And Powder | अनेकवेळा जे लोक जिम करतात त्यांना त्यांचे शरीर निरोगी ठेवायचे असते. तेव्हा लोक प्रोटीन पावडर खातात. परंतु तुम्ही देखील जास्त प्रमाणात प्रोटीन पावडरचे सेवन करत असाल, तर तुमच्या आरोग्याला यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आता भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशोधन परिषद आयसीएमआरने लोकांना मांसपेशी मजबूत बनण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन न करण्याचा सल्ला दिलेला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या सूचनानुसार यामुळे हाडांची हाडांमधील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि किडनी देखील खराब होण्याची शक्यता असते. कारण बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये जास्त प्रमाणात साखर, आर्टिफिशियल स्वीटनर्स यांसारखे पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला हानी निर्माण होते. परंतु या ऐवजी तुम्ही देसी प्रोटीन पावडरचे सेवन करू शकता आणि त्यातून तुम्हाला चांगली ताकदही मिळेल आणि शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही.

देशी प्रोटीन पावडर खा | ICMR Claims Protien Supplements And Powder

50 ग्रॅम भाजलेल्या चण्यांमध्ये 13 ते 14 ग्रॅम प्रोटीन असते. तसेच यात फायबर्स देखील जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. यामध्ये तुम्ही पाच ते सात ग्रॅम देसी तूप घाला. त्यामुळे शरीर तुमचे चांगले मजबूत होते. आणि तुम्ही हे दूध घालून देखील पिऊ शकता.

देशी प्रोटीन पावडर कशी तयार करावी ?

तुम्ही मिक्सरमध्ये भाजलेल्या चण्याची पावडर बनवून घ्या. आणि त्यात एक ग्लास दूध केळी घाला. दोन खजूर आणि पाच ग्रॅम गूळ घाला. यामुळे तुम्हाला प्रोटीन तर मिळतेच त्यासोबत मिनरल्स आणि विटामिन्स देखील मिळते. आणि तुमच्या शरीराची ताकद वाढते. हे मिश्रण जर तुम्ही 15 दिवस घेतले, तर तुम्ही निरोगी व्हाल तसेच तुमचा थकवा, कमकुवतपणा, गुडघेदुखीच्या वेदना देखील कमी होतील.

आयसीएमआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार मांसपेशी मजबूत करण्यासाठी प्रोटीन पावडर घेण्याऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या प्रोटीनचा आहारात समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर अमिनो ऍसिड मिळतील. त्याचप्रमाणे प्रोटीन पावडर घेणे. हे तुमच्या तब्येतीसाठी नुकसानकारक असते. यामुळे हाडांमधील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. आणि किडनी देखील खराब होऊ शकते.

प्रोटीनसाठी आणखी काय खावे?

शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी 30 ग्रॅम डाळींचे आणि नॅचरल प्रोटिन्सचे सेवन करा. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक फायदे मिळतील..यासोबतच तुम्ही जास्त प्रमाणात कडधान्य खा तसेच दूध आणि पनीर यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने देखील तुम्हाला प्रोटीन मिळते.