ICMR NIN Recruitment 2024 | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती, महिना मिळणार तब्बल 63 हजार रुपये पगार

ICMR NIN Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ICMR NIN Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आलेली आहे. ती म्हणजे आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत.त्यांनी तंत्रज्ञ असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क या पदांसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. आणि त्या अधिसूचनेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.

त्यांनी त्यांच्या या रिक्त पदांसाठी अजूनही अर्ज प्रक्रिया सुरू केलेली नाहीये. परंतु तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या भरती संबंधित सविस्तर माहिती पाहू शकता. तसेच महत्त्वाच्या गोष्टी देखील जाणून घेऊ शकता. 10 मार्च 2024 नंतर ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद (ICMR NIN Recruitment 2024) भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संसाधन विभागाच्या अंतर्गत काम करतात. या संस्था थेट भरती अंतर्गत ही रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून त्यांनी अर्ज मागवलेले आहेत. आता आपण कोणत्या रिक्त जागा आहेत आणि किती पदांसाठी त्या जागा असणार आहेत याची सविस्तर माहिती पाहूया.

रिक्त जागांचा तपशील | ICMR NIN Recruitment 2024

  • तंत्रज्ञ सहाय्यक – 4 जागा
  • तंत्रज्ञ l -9 जागा
  • लॅब असिस्टंट l – 21 जागा
  • निम्न विभाग लिपिक – 6 जागा
  • ग्रंथालय लिपिक – 1 जागा
  • उच्च विभाग लिपिक -7 जागा
  • ग्रंथालय आणि मान माहिती सहाय्यक -1 जागा
  • सहाय्यक ग्रंथालय माहिती अधिकारी -1 जागा

पगार

  • तंत्रज्ञ असिस्टंट लेव्हल 6 : 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये
  • टेक्निशियन 1 लेव्हल 2 : 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये
  • लॅब अटेंडंट 1 लेव्हल 1 : 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये