ICMR Recruitment 2024 | राष्ट्रीय पोषण संस्थेत विविध पदांसाठी होणार भरती; पगार मिळेल 60 हजार रूपये

ICMR Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ICMR Recruitment 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील पदांकरता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. आता या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रिक्त पदांची संख्या | ICMR Recruitment 2024

  • एसआरएफ या पदासाठी 1 रिक्त जागा आहे
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी एकूण 2 रिक्त जागा आहेत
  • प्रकल्प सहाय्यक या पदासाठी 2 रिक्त जागा आहे.

वयोमर्यादा

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि एसआरएफ या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प सहाय्यक या पदांचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराची वय 30 वर्ष असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता | ICMR Recruitment 2024

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस / AYUSH / BDS पदवी असणे आवश्यक आहे.

एसआरएफ [SRF]

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.SC./ M.A. / MSW पदवी असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक

उमेदवाराकडे, अँथ्रोपॉलॉजी / सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र/विज्ञान (बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी) क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे,किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असावे.

प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटोमिस्ट)

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MLT क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

वेतन

  • कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 60, 000 + 15000 FDA
  • एसआरएफ – 44,450 + 12,000 FDA
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 32,000 + 12,000 FDA
  • प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटमिस्ट) -31,000 + 12000 FDA

अर्ज प्रक्रिया

  • वरील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची अर्ज भरायची आहे.
  • यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सगळी माहिती जाणून घ्यावी लागेल.
  • 24 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज भरा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा