Idea Time for Eating | सगळेच जण आपल्या जेवणावर खूप लक्ष ठेवून असतात. आपण काय खावे याकडे नेहमीच लक्ष दिले जाते. परंतु आपण दिवसातून किती वेळा खावे. हे देखील लक्षात ठेवायला हवे. आयुर्वेदानुसार आपली पचन शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला भूक लागेल. तेव्हा खाल्ले जाते. परंतु जर तुम्ही दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा जेवत असाल तर आपल्याला हे प्रमाण कमी करायला हवे. त्यामुळे आपल्या आरोग्य नीट राहण्यासाठी आपण कधी जेवतोय याकडे खूप लक्ष दिले जाते.
याबद्दल आयुर्वेद तज्ञ डॉक्टर डिंपल सांगाडा यांनी सांगितले की, ‘आपल्या भुकेपेक्षा किती प्रमाणात जास्त किंवा कमी खावे याशिवाय कधी आणि काय खावे हे माहीत असणे देखील गरजेचे आहे. नियमित जेवणाची एकच वेळ पाळल्याने आपल्या आरोग्याला देखील त्याचा फायदा होतो.”
हेही वाचा – Tata Automatic CNG Car : Tata ने लाँच केल्या 2 ऑटोमॅटिक CNG कार; किंमत किती पहा
आपलं वय वाढलं की, आपल्या भुकेवर देखील त्या सगळ्याचा परिणाम होतो. आपल्या शरीरात विटामिन्स आणि मिनरल्स या गोष्टींची कमतरता भासते. ते भरून काढण्यासाठी तुम्हाला पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. त्यामुळे अशावेळी आपल्या ताटामध्ये भाज्या कडधान्य ड्रायफ्रूट फळे त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थांचा समावेश देखील असणे गरजेचे आहे.
बऱ्याच वेळा आपल्याला भूक लागत नाही. त्यामुळे आपण जेवत नाही. परंतु असे करू नका कारण त्यांनी आपल्या शरीराला नुकसान पोहोचते. त्यामुळे पौष्टिक घटक खा भूक लागल्यानंतर हेल्दी पदार्थ खा. त्याचप्रमाणे तुमच्या 80 टक्के पोट भरेल इतकेच खा. त्याचप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर जास्त पचायला अवघड असणारे पदार्थ खाऊ नका.
दिवसातून तीन वेळा खाण्याचे फायदे | Idea Time for Eating
तुम्ही तुमच्या चांगल्या जीवनशैलीसाठी दिवसातून तीन वेळा देखील खाऊ शकता. सकाळी चांगला नाश्ता दुपारचे हेवी लंच आणि रात्रीचे हलके खाल्ल्याने तुमच्या शरीर सुदृढ राहील त्याचप्रमाणे जेवणाच्या गॅपमध्ये काही खाऊ नका. त्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्य चांगले पचेल.
आयुर्वेदानुसार दोन वेळा जेवणाचे देखील अनेक फायदे आहेत. आपण दोन जेवणांमध्ये सहा तासांच्या अंतर ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न चांगल्या प्रमाणात असते आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.