साउथ इंडियन पद्धतीचा असलेला इडली हा नाश्त्याचा प्रकार आता जवळपास सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे केवळ दाक्षिणात्य भागामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये ही डिश आवडीने खाल्ली जाते. जास्त तेलकट नसलेली पौष्टिक अशी इडली सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
मात्र सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये इडलीचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया लवकर होत नाही त्यामुळे इडलीचे पीठ फसफसत नाही आणि इडल्या चांगल्या होत नाहीत. अशावेळी करायचे काय? तर याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत. काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर इडलीचे पीठ मस्त फुगेल शिवाय इडल्या सुद्धा मउसूत होतील. चला तर मग जाणून घेऊया…
वापरा ह्या सोप्या ट्रिक्स
- इडली बनवण्यासाठी चे पीठ बनवताना सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला पाच ते सहा तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे.
- दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडदाची डाळ ही तांदळात न भिजवता उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे हे वेगळ्या भांड्यामध्ये भिजत ठेवायचे आहे.
- इडलीच्या पिठात पोहे घातल्यास इडल्या छान सॉफ्ट होतात. त्यामुळे 1/4 कप पोहे तीन चार तासांसाठी भिजत घाला आणि नंतर भिजत घातलेली उडदाची डाळ आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- नंतर तांदूळ देखील मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या आणि हे पीठ आठ ते दहा तासासाठी आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी झाकून ठेवा.
- सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे पीठ लवकर आंबत नाही त्यामुळे इडल्या फुगत नाहीत किंवा चवही बिघडते पीठ आंबवण्यासाठी उबदार वातावरणाची गरज असते. आठ-दहा तासांसाठी भिजवत ठेवतो ते उबदार ठिकाणी ठेवा.
- पीठ आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर डब्याच्या भोवती किंवा पातेल्याच्या भौतिक घोंगडी किंवा स्वेटर गुंडाळून ठेवा किंवा पीठ अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडी तरी उब मिळेल
- तुमच्या घरात जर ओव्हन असेल तर थोड्या वेळासाठी ओवन गरम करावं थोडासा गरम झाल्यानंतर स्विच ऑफ करा आणि आता त्यामध्ये पीठ ठेवा हे उष्णता पीठ आंबवण्यासाठी पुरेशी असते.
- एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तांदूळ कमीत कमी पाण्याने बारीक करून घ्या तसेच पीठ मऊसर होते तसंच इडलीचे पीठ साधारण आठ तास तरी चांगले अंबायला हवे. थंडीत पीठ आंबण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.