संशयित रित्या कोणी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा : बी. आर. पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तालुक्यातील पाचवड वस्ती येथे एक महिला संशयित रित्या फिरत होती. सामाजिक कार्यकर्ते  भाऊसाहेब विठठल ढेब यांनी सदरची माहिती कराड शहर पोलीस स्टेशनला फोन करुन कळविली. तेव्हा असे संशयित रित्या कोणी आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मुले चोरणारी व्यक्ती, पुरूष म्हणून मारहाण करू नये, असे आवाहन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.

पाचवड वस्ती येथे संशयीत रित्या फिरत असलेल्या महिलेस पोलिसांनी मदत पाठवात, ताब्यात घेतले. घटनास्थळी एक पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी यांनी सदर महिलेकडे चौकशी केली असता, ती हिंदीमध्ये बोलत होती. महिला फक्त तीचे नाव सांगत होती. तिला तिचे नाव व पत्ता सांगता येत नसल्याने सदर महिलेला पोलीस स्टेशन येथे आणून तीच्याकडे चौकशी केली. तेव्हा शर्मिला जयसिंग सोनिया असे नाव सांगितले. तिला तिचा पत्ता व्यवस्थित सांगता येत नव्हता, तीच्याकडील सामानाची झडती घेतली असता. बॅगमध्ये फक्त कागद भरले होते. तसेच तीच्या बॅगमध्ये कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही. सदरची महिला ही मुले चोरून नेणारी नव्हती. ती अर्ध वेडसर असल्याने ती हिंदी मध्ये “मुझे इंदोर जाना है, मुझे पैसे दे दो” असे म्हणत होती. त्यामुळे कराड मधील सामाजिक संस्थाच्या मदतीने तिला थोडी पैशाची मदत करुन ओगलेवाडी रेल्वे स्टेशन येथून रेल्वेत सुखरूप बसविण्यात आले आहे.

तरी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, कोणतीही संशयित महिला अगर संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांनी तात्काळ कराड शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सदर संशयित व्यक्ती व महिला यांना कोणीही मारहाण करू नये. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू, असे आवाहन कराड वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.