हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सर्वत्र सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ पाहायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून काल्पनिक फोटो व्हायरल झालेलं आपण अनेकदा बघितलं असेल. भारतात सध्या T20 विश्वचषक स्पर्धा आणि दुसरीकडे केंद्रातील मोदींचे नव्याने स्थापन झालेलं मंत्रिमंडळ दोन्हीही ट्रेंडिंगवर आहेत. क्रिकेट आणि राजकारण यात भारतातील लोकांना खूप इंटरेस्ट असतो. अशावेळी जर क्रिकेटपटू राजकारणी असते तर? कोणत्या खेळाडूला कोणतं मंत्रिपद मिळालं असत? याबाबत तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल. AI ने याबाबत वेगवेगळ्या खेळाडूंचे फोटो आणि मंत्रिमंडळातील त्यांचं पद याबाबत सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेउयात ….
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा या कॅबिनेट मंत्रिमंडळात पंतप्रधान असेल. टीम इंडियाचा कर्णधार असल्याने देशाच्या पंतप्रधान पदाची माळ ऑटोमॅटिक रोहितच्या गळ्यात पडली.
यानंतर भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहली गृहमंत्र्यांच्या रूपात आहे. जस अमित शाह यांची मोदींना साथ असते त्याचप्रमाणे टीम इंडियात विराटची साथ नेहमीच रोहितला लाभली आहे.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री म्हणून दिसतोय.
विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतच्या खांद्यावर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे.
फिरकीपटू रवींद्र जडेजा कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं असं AI ला वाटत.
भारताचा दिग्गज गोलंदाज आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहकडे संरक्षण आणि रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी AI ने दिली आहे.
सलामीवीर केएल राहुलने अर्थमंत्री म्हणून कारभार बघितला असता.
मोहम्मद सिराज कडे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपद देण्यात आलं असत
चायनामेन बॉलर कुलदीप यादव – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री झाला असता
(फोटो स्त्रोत: @sahixd/instagram)