कुंडलीत शनिची पीडा असल्यास शनिवारी करा हे उपाय; सर्व मनोकामना होतील पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवार हा शनिदेवतेच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी शनि देवाची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतो असे म्हटले जाते. मुख्य म्हणजे ज्या लोकांच्या कुंडलीत शनी कमजोर आहे अशा लोकांना आजच्या दिवशी शनि देवाची पूजा करण्याचा सल्ला अवश्य देण्यात येतो. अशा स्थितीत शनि देवाची पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होते. त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत शनिचा दोष आहे त्या लोकांनी आजच्या दिवशी अवश्य शनि देवतेची पूजा करावी. परंतु त्यासाठी कोणते उपाय करावेत? जेणेकरून शुभ परिणाम प्राप्त होईल? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शनिवारच्या दिवशी करा हे उपाय

दान करा – शनिवारच्या दिवशी दान पुण्याचे काम केल्यास शनि देवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. या दिवशी गरजू लोकांना वस्तूंचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होईल. तसेच कुंडलीतील दोष देखील टळून जाईल.

शनि मंत्र म्हणा

शनिला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी शनिच्या मंत्राचा जप करावा, असे मानले जाते शनिवारी शनीच्या मंत्राचा जप केल्यास पैसा व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित अडचणी सर्व दूर होतात. तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते.

या मंत्राचा करा जप

ओम शाम शनिश्चराय नम:

शनिदेवाच्या नामस्मरणाचा वैदिक मंत्र

ऊँ शन्नो देवी अभिष्टदाआपो भवन्तु पिताये ।

कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी शनिवारी उपवास, हनुमानाची पूजा, शनि मंत्र, शनि यंत्र असे प्रमुख उपाय करा. दर शनिवारी शनि देवाची पूजा करा.