कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मग ते फेडणार कोण? काय सांगतो RBI चा नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बँकेकडून प्रत्येक गोष्टीवर कर्ज मिळत आहे. मग होम लोन असो किंवा एज्युकेशन लोन असो. बँक लोन देते. त्यामुळे त्यास वेगवेगळ्या विभागात विभाजीत करण्यात आले आहे. अनेकदा असे होते की, एखादा व्यक्ती आपल्या नावे लोन घेतो आणि काही कारणास्तव तो ते लोन वेळेत फेडू शकत नाही. यावेळी बँक त्याच्या मालमत्तेचा लिलाव करते आणि कर्ज वसुल करते. मात्र जर कर्ज घेणार व्यक्तीच हयात राहिला नाही तर काय? याबाबत RBI चे नियम काय आहेत. हे जाणून घेऊयात.

काय आहेत RBI चे नियम?

जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेऊन ठेवले असेल आणि अचानक त्याचा मृत्यू झाला तर त्याची थकबाकी भरण्यासाठी कोण जबाबदार असणार असा प्रश्न अनेकांना पडतो. खरतर RBI ने याबाबत कोणतेही नियम बनवलेले नाहीत. व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्ज फेडण्यासाठी त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचं कर्ज घेतले होते. यावर ते अवलंबून असते.

गृहकर्ज मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारश्याला फेडावे लागते

RBI च्या नियमामध्ये जर एखाद्या व्यक्तीने घरासाठी कर्ज घेतले असेल. आणि त्याचा अचानक मृत्यू झाला तर ते कर्ज फेडण्यासाठी त्या व्यक्तीचा वारस जबाबदार असतो. परंतु जर त्यानेही वेळेवर कर्ज फेडले नाही तर बँक असलेल्या मालमत्तेचा लिलाव करते आणि कर्ज वसुल करते. परंतु यामध्ये जर गृहकर्जाचा विमा उतरवला असेल तर विमा कंपनी कर्जाची वसुली करते. तसेच जर मुदतीचा विमा घेतल्यास, दाव्याची रक्कम नॉमिनीच्या खात्यात जमा होते आणि याद्वारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे कायदेशीर असलेल्या वारसाला केवळ बाकी असलेल्या रकमेतून पैसे देण्याचा अधिकार आहे.

कोणत्या प्रकारच्या कर्जावर नियम नाहीत?

मृत्यू झालेल्या व्यक्तीने जर पर्सनल लोन, कार लोन आणि क्रेडिट कार्ड वर लोन या प्रकारातील लोन घेतलेले असेल तर ते लोन फेडण्यासाठी RBI ने कोणतेही नियम व निकष लावलेले नाहीत.

बँक पर्सनल आणि क्रेडिट लोन वसुल करू शकत नाही

हा प्रश्न पडणं साहजिक आहे की बँक पर्सनल आणि क्रेडिट लोन व्यक्तीच्या मृत्यूनंतर का वसुल करू शकत नाही. तर या कर्जाला कोणीही तारण नसते. त्यामुळे बँक कायदेशीर वारस तसेच कुटुंबातील सदस्य यांच्याकडून कर्ज वसुल करू शकत नाही. परंतु जो सह खरेदीदार आहे तो ही रक्कम फेडू शकतो. मात्र हेही शक्य न झाल्यास मग बँक NAP म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ऍसेट घोषित करते.

कार लोनसाठी बँक साधते कुटुंबियांशी संपर्क

जर मृत्यू झालेल्या व्यक्तीने कारसाठी लोन घेतले असेल तर ते लोन फेडण्यासाठी बँक त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना संपर्क साधते.  संपर्क यासाठी की, जर कुटुंबातील व्यक्ती कार ठेऊ इच्छित असेल आणि राहिलेली रक्कम फेडू शकत असेल तर कार त्या व्यक्तीकडेच ठेवली जाते आणि राहिलेली थकबाकी मिळवली जाते. मात्र असे जर त्या व्यक्तीने केले नाही तर बँक कार जप्त करते आणि त्याचा लिलाव करून कर्ज वसुल करते. असा एक नियम आहे.