10वी- 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! देशातील ‘या’ एअरपोर्टमध्ये 1086 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी आणि 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (IGI Aviation Recruitment) मध्ये 1086 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा एजंट पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
पद संख्या – 1086
भरले जाणारे पद – ग्राहक सेवा एजंट
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी- 12वी उत्तीर्ण असावा
वेतन किती – दर महिना 15,000 – 25,000 रुपये
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023

निवड प्रक्रिया –
1. सर्वप्रथम उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल.
2. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सदर उमेदवार कंपनीच्या दिल्ली येथील नोंदणीकृत कार्यालयात वैयक्तिक मुलाखतीसाठी उपस्थित राहतील.
3. लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या वैयक्तिक फेरीच्या एकत्रित मार्कच्या आधारावर उमेदवाराची निवड होणार आहे.
4) उमेदवाराची वैद्यकीय चाचणी आणि त्यानंतर त्यांची वर्णपूर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – igiaviationdelhi.com