IIT बाबाला मारहाण; या लोकांवर केला थेट आरोप

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाकुंभ मेळ्यात अनेक अनके लोक चर्चेत आले. त्यातच आयआयटी बाबा म्हणजेच अभय सिंह हे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होते . कारण त्यांनी या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) भारत पाकिस्तान सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली होती. भारत पाकिस्तानकडून हरणार असे बोलले होते. पण त्यांची हि भविष्यवाणी खोटी ठरली आहे. आता पुन्हा एकदा हे बाबा चर्चेचा विषय बनले आहेत. IIT बाबानी “मला काही लोकांनी मारहाण केली आहे” असा आरोप केला आहे. तर हि नेमकी घटना काय आहे? त्यांना लोकांनी का मारले? हे आज आपण या बातमीत पाहणार आहोत.

एक खळबळजनक पोस्ट –

आयआयटी बाबानी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी एका मीडिया संस्थान , कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण केली आहे , असा आरोप केला आहे. त्यांनी फक्त आरोप केला नसून , पोलीस स्टेशनला लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी लिहलेली तक्रार इंस्टाग्रामवरही अपलोड केली आहे. पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिसाद दिला आहे.

आयआयटी बाबाना मारहाण –

हे आयआयटी बाबा म्हणतात कि , “28-02-2025 रोजी एका खासगी न्यूज चॅनलने मला इंटरव्यूसाठी बोलावले होते. इटंरव्यू दरम्यान त्या लोकांनी माझ्यासोबत अपमानास्पद वर्तन केले. या कार्यक्रमादरम्यान बाहेरुन काही लोक भगवा वेश धारण करुन न्यूज रुमच्या आत आले. त्यांनी मला मारहाण केली. जबरदस्तीने त्यांनी मला एका खोलीच्या आत बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वामी वेदमूरती नंद सरस्वती नावाच्या भगवे कपडे परिधान केलेल्या व्यक्तीने माझ्यावर काठीने हल्ला केला . मी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला , या सर्व घटनेच्यावेळी मी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट चालू ठेवलं होतं. जिथे संपूर्ण हकीकत समोर येईल'” घटनेची माहिती मिळाल्यानंतर, अभय सिंह नोएडा सेक्टर 126 येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली गेली आहे.