परदेशातील नोकरीवर लाथ मारत इल्मा बनली IPS अधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे तिनं शिकवण्या घेतल्या. रात्रीदिवस अभ्यास करून आईसोबत शेतात काम करत ती बनली IPS अधिकारी. हि यशोगाथा आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोज या मुलीची…

इल्माने लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. केवळ 14 वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंब आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. तिने आईसोबत शेतात काम करत अभ्यास केला आणि आपले आधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

iilma

ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिप

मुरादाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इल्मा अफरोजने सेंट स्टीफन्स, दिल्ली येथे प्रवेश घेतला. तेथून तिने तत्त्वज्ञानात पदवीचे शिक्षण घेतले. सेंट स्टीफनमध्ये घालवलेल्या वर्षांना ती तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ मानते. जिथे तिला खूप काही शिकायला मिळाले. इल्माने घेतलेल्या मेहनतीमुळे तिला ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

iilma

शिकवणी घेत केले शिक्षण पूर्ण

इल्माला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली. मात्र, त्यावेळी परदेशात जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. यासाठी तिने गावातील चौधरी दादांची मदत घेतली. इतर खर्च पूर्ण करण्यासाठी तिने शाळेतील मुलांची शिकवणी घेण्याचे आणि मुलांना संभाळण्याचा निर्णय घेतला. शिकवण्या घेत तिने पैसे गोळा केले.

Ilma Afroz

परदेशातून परत येत दिली UPSC परीक्षा

पोस्ट ग्रॅज्युएशननंतर, इल्मा अफरोज एका स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. तिथे तिला फायनान्शिअल इस्टेट कंपनीत उत्तम नोकरीची ऑफर मिळाली. पण आपल्या शिक्षणावर आईचा आणि देशाचा हक्क आहे, असे तिला सतत वाटायाचे म्हणूनच तिने भारतात परतून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये, इल्माने नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून 217 वा क्रमांक मिळविला. तेव्हा ती 26 वर्षांची होती. सध्या ती शिमल्यात SP SDRF म्हणून तैनात आहे.