पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!! या खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वर्ल्डकप संपून अवघे काही दिवसच झाले आहेत. या वर्ल्डकप मध्ये प्रत्येक संघाने आपल्या परीने चांगल खेळण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले तर काहींना अपयश. त्यातील एक संघ म्हणजे पाकिस्तानी संघ. वर्ल्डकप मधील अपयशामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघात (Pakistan Cricket) सध्या वाद सुरु आहे. यानंतर पाकिस्तानी बोर्डाने संपूर्ण संघरचनाच बदलली आहे. या वादामुळे कर्णधारपदी स्वतःला पाहू इच्छिणाऱ्या अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वर्ल्डकप मधील संघाच्या कामगिरी वरून पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड नाराज आहे. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर आता कसोटी संघाची धुरा शान मसूदजवळ सोपवन्यात आली आहे. आणि शाहीन आफ्रिदीकडे ट्वेंटी-20 संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व गोंधळात इमाद वसीमला कोठेही स्थान देण्यात आले म्हणून त्याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. येणाऱ्या आगामी काळात इमाद हाच पाकिस्तानी संघाचा कर्णधार होणार अशी आशा इमादला आणि त्याच्या चाहत्यांनाही होती. मात्र त्यास संघातून सतत वगळ्यामुळे त्याने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे.

तो ट्विट करत म्हणतो की ” अलिकडच्या काही दिवसांपासून मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार करत आहे. त्यामुळे या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मला PCB ने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे ही खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये माझे 121 सामने खेळण्याचे एक स्वप्न पूर्ण झाले. नवीन प्रशिक्षक आणि नेतृत्वाच्या आगमनासह पाकिस्तान क्रिकेटसाठी हा एक रोमांचक काळ आहे. त्यामुळे मी संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहण्यास उत्सुक आहे. तसेच मी माझ्या चाहत्यांचेही आभार मानतो. माझ्या कुटुंबाने आणि माझ्या मित्रांनी मला सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यास मदत केली आहे. मी आता आंतरराष्ट्रीय स्तरापासून दूर राहून माझ्या खेळाच्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहे.” असे ट्विट करत इमादने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

पाकिस्तानी संघ आता ओस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी संघात शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद,  मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी. यांचा समावेश असणार आहे. या संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र इमादला वगळण्यात आले आहे.