महिला बॉक्सरविरुद्ध पुरुषाची लढत? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाचे लक्ष्य असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मोठी खळबळजनक घटना घडली आहे. 1 ऑगस्ट रोजी झालेल्या महिलांच्या 66 किलो वजनी गटाच्या लढतीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमान खलीफ (imane khelif vs angela carini) यांच्यात हा सामना सुरु झाला मात्र अँजेलाने अवघ्या 46 सेकंदात या सामन्यातून माघार घेतली. यामुळे अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफला विजेता घोषित करण्यात आले. मात्र अँजेलाच्या माघारीचे खरं कारण आहे ते म्हणजे इमान खलीफच्या ‘लिंग तपासणी संदर्भात.. कारण इमान खलीफच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण असामान्य असल्याने तिची लिंग तपासणी यशस्वी ठरली होती. यामुळेच तिला 2023 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ‘अपात्र’ करण्यात आले होते,तरीही ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत तिला संधी मिळालीच कशी असा प्रश्न निर्माण होतोय.

कॅरिनी आणि खलीफ यांच्यात थोडाच वेळ सामना झाला. दोघीनी एकमेकींना पंच मारले, मात्र अँजेला कॅरिनीने मध्येच डाव सोडला. त्यानंतर कॅरिनीने खलिफचा हस्तांदोलन करण्यासही नकार दिला आणि खेळाचं रिंगणातच ती ओक्साबोक्शी रडू लागली. मला कधीच इतके कठोर मुक्रे मारले गेले नव्हते. मी नेहमीच माझ्या देशाचा सन्मान केला आहे. यावेळी मी यशस्वी झाली नाही, कारण मी यापुढे लढू शकत नाही. मला माझ्या नाकात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे मला माघार घ्यावी लागली, असं अँजेला कॅरिनीने सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर सोशल मीडियावर जेला कॅरिनीच्या समर्थनार्थ चाहते उभे राहिलेत. तसेच ऑलिम्पिकच्या एकूण नियोजनावरही सडकून टीका केली जात आहे. एका महिलेसमोर पुरुषाला का उभे केले, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा निर्माण झाली आहे. इटलीच्या पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी यांनीही या वादात उडी घेत म्हंटल कि, ज्या खेळाडूंमध्ये पुरुष अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत त्यांना महिलांच्या स्पर्धांमध्ये प्रवेश देऊ नये असं मत व्यक्त केलं. या सामन्यानंतर #IStandWithAngelaCarini सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.