राज्य शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय, बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत भरता येणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यातच आणखी एक भर म्हणजे बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थी आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरू शकणार आहेत.

राज्यातील कोविडची परिस्थिती पाहता कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8 हजार 250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे 23 एप्रिल पासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष ,अतिविलंब शुल्क सह परीक्षा अर्ज भरता येईल.वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये परीक्षेसंदर्भात एकमतानं निर्णय घेण्यात आला बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन सुरू आहे. परंतु परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा आता शिक्षण मंडळाने दिली आहे.

दरम्यानच दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कोणत्या पद्धतीने केले जाणार याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे देखील लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय अकरावी मध्ये प्रवेश देताना कोणत्या बाबींचा विचार करून प्रवेश दिला जाईल याबाबातही संभ्रम निर्माण होत आहे.

Leave a Comment