केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय; ‘TET’ प्रमाणपत्र वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र अर्थात (TET) सर्टिफिकेटची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे.

यापूर्वी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही तरी इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता व मर्यादित कालावधीसाठी वाढवली आहे. याबाबत बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं की पूर्वलक्षी प्रभावाने व 2011 या वर्षापासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी 2011पासून चे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल असं पोखरियाल यांनी सांगितलं.
2011 या वर्षानंतर ज्या उमेदवारांचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र बाद झाले आहे अशा सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.