नवरात्रोत्सवानिम्मित मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश जारी; हे नियम पाळणे असेल बंधनकारक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीसाठी दांडिया आयोजकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात नऊ दिवस मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरी करण्यात येईल. याकाळात प्रत्येक ठिकाणी दांडिया नाईटचे देखील आयोजन करण्यात येईल. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी रुग्णवाहिका ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली की तरुणांचा धांगडधिंगा ही सुरू होती. यात रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात. अशावेळी त्यांच्या हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच, त्यांना श्वास घेण्याच्या समस्या देखील उद्भवतात. अशावेळी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून अगोदरच सर्व उपाययोजना तयार असाव्यात, यासाठी एकनाथ शिंदे यांनी दांडिया आयोजकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन करणे दांडिया आयोजकांना बंधनकारक असणार आहे.

महत्वाच्या सूचना

राज्यात ज्या ज्या ठिकाणी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, तेथे आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात यावे. तसेच, इमर्जन्सी परिस्थितीत ॲम्बुलन्स देखील तयार असावी, एखाद्या व्यक्तीला काही झाल्यास त्याला त्वरित प्राथमिक उपचार देण्याची सोय दांडिया आयोजकाने केलेली असावी, अशा सर्व महत्वाच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सध्याचे बदलते वातावरण बघता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्रथम स्थानी ठेवून सरकारकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये, सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे हे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, येत्या 15 ऑक्टोंबरपासून ते 23 ऑक्टोंबरपर्यंत राज्यात नवरात्रोत्सवाचे वातावरण राहील. यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी म्हणून आत्तापासूनच सर्व उपाययोजना राबवण्यासाठी सुरुवात झाली आहे. याकाळात सर्वात जास्त गर्दी ही दांडीया कार्यक्रमांमध्ये दिसून येते. या कार्यक्रमांमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा ही वाढते आणि गर्दी ही वाढते. त्यामुळे अशा ठिकाणी पोलीस तैनाव ठेवणे आरोग्य सुविधा राबवणे, अशा सर्व सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.