भारतात राहण्यासाठी भारतीय नागरिकांकडे अनेक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. दररोज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. अशी अनेक कागदपत्रे आहेत ज्याशिवाय अनेक कामे ठप्प होऊ शकतात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे. आधार कार्ड हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे दस्तऐवज आहे. भारतातील जवळपास ९० टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे.
जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड नाही
अनेक लोक अनेक ठिकाणी आधार कार्डचा आधार कागदपत्रे म्हणून वापर करतात. त्यामुळे अनेक लोक जन्मतारखेचा पुरावा म्हणूनही विचार करतात. तुमचाही असाच विचार असेल तर ती तुमची चूक आहे.अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने आधार कार्डबाबत हा निर्णय दिला आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यासंदर्भातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जन्मतारीख पुरावा म्हणून आधार कार्ड न स्वीकारण्याबाबत हा निर्णय दिला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने यापूर्वी आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा मानला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जन्मतारखेचा पुरावा म्हणून फक्त शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच SLC स्वीकारला आहे. या प्रकरणात, कनिष्ठ न्यायालयाने जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला वैध दस्तऐवज मानला होता.
मिळालेल्या माहितीनुसार UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आधार कार्डासंदर्भात एक अधिसूचना जारी केली होती ज्यामध्ये आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणून वापरता येईल असे सांगण्यात आले होते. जन्मतारीख म्हणून नाही.असे सांगण्यात आले होते.