Monday, January 30, 2023

महत्वाची बातमी! JEE(main) ‘मे’ सेशनची परीक्षा पुढे ढकलली…

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मे 2021 सेशनची JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

याबाबत बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे की, ‘सध्याची covid-19 ची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मे 2021 ची घेईन मुख्य सेशन पुढे ढकलण्यात आले आहे’. याबरोबरच त्यांनी पुढील अपडेट साठी NTAअधिकृत संकेत स्थळाला भेट ‘देण्याची सूचना केली आहे.

- Advertisement -

जेईई-मेन 2021 सत्र ची परीक्षा 24,25, 26,27, 28 मे 2021 रोजी घेण्यात येणार होती. तर एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा 27 ,28 आणि 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार होत्या मात्र या परीक्षादेखील स्थगित करण्यात आले आहेत. एनटीएने दिलेल्या नोटिसानुसार यावेळी परीक्षेच्या अधिक चांगल्या तयारीसाठी उमेदवार या वेळेचा उपयोग करु शकतात. विद्यार्थी एनटीए अभ्यास अ‍ॅपच्या माध्यमातून घरी बसून परीक्षेची तयारी करू शकतात.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता. राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. तसेच राज्यातील शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत.