सातारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; बचाव कार्य सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या गावात प्रशासनाच्यावतीने मदतकार्य केले जात असून नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मौजे मिरगाव येथील एक मयत व्यक्ती आढळून आलेली आहे. तथापि, भूस्खलनाखाली व्यक्ती गाडल्या गेल्या असल्यामुळे निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी जिल्हा वासियांना महत्वाचे आवाहन केले.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/4110250155759047/

 

जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी म्हंटले आहे की, सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी अतिवृष्टीमधे काळजी घ्यावी. जिल्ह्यातील वाई, जावळी, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात असलेल्या अनेक दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातील पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दर्दी कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. तसेच या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोकही अडकले असून काहींचा मृत्यू झाला आहे. त्यांना प्रशासनाच्यावतीने व एनडीआरएफच्या तिंच्यावतीने मदत केली जात आहे. ठिकाणी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेत दिली आहे.

Leave a Comment