म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीबाबत आली महत्वाची अपडेट ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परवडणारी घरं देणारी संस्था म्हणून म्हाडा प्रचलित आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणांमध्ये घरांची किंमत गगनाला भिडली असताना म्हाडा कडून घर घेण्यासाठी गृह खरेदीदारांना दिलासा मिळतो. जर तुम्ही देखील म्हाडाच्या पुणे विभागाकडून अर्ज भरला असेल किंवा भरू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 घरांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 10 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

7 जानेवारी ला सोडत

या नवीन वेळापत्रकानुसार पुणे मंडळाच्या कार्यालयात 7 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोडत काढली जाणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी सोडती साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार तसेच सुविधा मिळावी यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गृह खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर दहा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून 59 पर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आलेली आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाईल. तसेच 13 डिसेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्यात येणार आहे.

घरांची विभागणी

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 घर
  • म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 घर
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 418 घर
  • 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3312 घर
  • 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेत 131 घरांचा समावेश आहे.

म्हाडाच्या या योजनेसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत म्हाडाच्या वेबसाईटवरून सहभाग घ्यावा तसेच इतर योजनांसाठी http://housing.mhada. gov. In या वेबसाईटवरून सहभाग घ्यावा