व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट हाती

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रकृती बद्दल महत्वाची अपडेट हाती आली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती एम्सच्या (AIIMS) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

देशात सर्वत्र कोविडची साथ पसरली असताना अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना देखील कोरोनाने गाठले आहे. अशातच देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे 19 एप्रिल रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. त्यांना हलका ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता 87 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान मागील वर्षी एका नव्या औषधांमुळे त्यांना रिएक्शन आणि ताप आला होता त्यामुळे देखील त्यांना एम्स मध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर बरेच दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्या राजस्थान राज्यसभा सदस्य आहेत. 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषवले आहे. 2009 साली एम्स मध्ये त्यांची करोनरी बायपास सर्जरी झाली होती.