लवकर डिस्चार्ज होतेय का मोबाईलची बॅटरी? तर हे करा उपाय; वाढेल बॅटरीचा स्टॅमिना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेला आहे. वेळोवेळी मोबाइल सोबत असणे आता गरजेचे झाले आहे. यातच जर आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर डोक्याला मोठा ताप होऊ शकतो. दिवसाचे नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामूळे आपल्या मोबाईलची बॅटरी खूप वेळ चालू शकते. त्यामुळे आपण आपले काम सहज करू शकाल व आपली एक महत्वाची अडचण दूर होऊ शकते.

दिवसभर अनेक तास फोन चालवत राहणे बॅटरी संपवण्यासाठी नक्कीच पुरेसे आहे. स्क्रीन जितकी जास्त वेळ ऑन असेल तितका बॅटरीचा जास्त वापर होईल. येथे आपण ब्राईटनेस कमी करून बरिच बॅटरी वाचवू शकता. जर आपण आपला फोन बराच वेळ व्हायब्रेट मोडमध्ये ठेवला असेल तर आपण असे करणे टाळले पाहिजे. व्हायब्रेशन मोटर देखील बॅटरिचा जास्त वापर करते. परंतु जेव्हा आपण टाइप करता तेव्हा बरेच कीबोर्ड हॅप्टिक फीडबॅक देतात, ज्यामुळे बॅटरीचा वापर वाढू लागतो. फोनमध्ये व्हायब्रेट मोडची आवश्यकता नसल्यास हे वैशिष्ट्य बंद करा. आपल्या स्मार्टफोनमध्ये अॅप्सचा साठा असतो आणि हे अॅप्स आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन देत राहतात. यापैकी बर्‍याच नोटिफिकेशन कामाच्या नसतात. या नोटिफिकेशनच्या सूचना थांबविण्याचा प्रयत्न करा. यासाठी आपल्याला सेटिंग्ज अंतर्गत अ‍ॅप अँड नोटिफिकेशन्सच्या अधिसूचनेवर जावे लागेल आणि आपण आपल्या इच्छेनुसार अॅपच्या सूचना बंद करू शकता.

आजच्या काळात फोनवर खूप तास वाय-फाय कनेक्ट केलेले असते. वायरलेस इयरफोन आणि स्मार्टवॉच किंवा स्मार्ट बँडने ब्लूटूथचा वापर वाढविला आहे. बरेच अॅप्स जीपीएसमध्ये सतत प्रवेश करतात, त्या मुळे आपल्या फोनवरील लोकेशन सेवा देखील सतत चालू असते. अशा परिस्थितीत, लोकेशन सर्व्हिस, वाय-फाय आणि ब्लूटूथ फक्त आवश्यक असल्यासच वापरण्याचा प्रयत्न करा, अन्यथा ते बंद ठेवा. Google आपल्या Android ऑपरेटिंग सिस्टममध्ये बॅटरी वाचविण्यासाठी बॅटरी बचत मोड किंवा अनुकूलक बॅटरी मोड वैशिष्ट्य प्रदान करते. बर्‍याच स्मार्टफोन कंपन्या अँड्रॉइडवर आधारित कस्टम स्कीनमध्येही हे फीचर टाकतात. हे वैशिष्ट्य आपल्याला बरिच बॅटरी वाचविण्यात मदत करू शकते.